औरंगाबाद : राज्यातील सर्व मंदिरं उघडा या मागणीसाठी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. याला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे.
हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना केला आहे. टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आमच्या मंदिरात एमआयएमचे लोक येत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमने आंदोलन करुच नये. मुख्यमंत्र्यांनी मंदिरं आठ-दहा दिवसात सुरु करणार असं सांगितलं आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी खैरेंवर टीकास्त्र सोडलंय.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती
मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक; मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार
मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका
मंदिर, मस्जीद उघडा अन्यथा…; रामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा