अधिवेशन सूरू असतानाच, भर सभागृहात भाजप आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ लावला अन्…

0
230

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच भाजपच्या एका आमदाराने सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

‘एनडीटीव्ही’ या वृ्त्त वाहिनीनं दिलेल्या वृ्त्तानुसार, संबंधित आमदाराचं नाव जादब लाल नाथ असून ते भाजपकडून त्रिपुरातील बागबासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. घटनेच्या दिवशी त्रिपुरा विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, यावेळी आमदार जादब लाल नाथ हे आपल्या फोनवर पॉर्न पाहताना आढळले आहेत.

हे ही वाचा : पंतप्रधानांना भेटून आले आणि…; मंत्री दीपक केसरकरांनी, उद्धव ठाकरेंबद्दल केला मोठा गाैफ्यस्फोट

आमदार नाथ हे आपल्या फोनवर काही व्हिडीओ स्क्रोल करत होते. याच दरम्यान, त्यांच्या फोनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. यानंतर आमदार नाथ यांनी आपण सभागृहात आहोत, याचं भान विसरून संबंधित व्हिडीओ पाहिला. यावेळी काही आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत होते. हा संपूर्ण प्रकार सभागृहात नाथ यांच्या मागे बसलेल्या एका आमदाराने रेकॉर्ड केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले; शिंदे गटाचा आरोप

जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…

ठाण्यात राडा! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here