आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला
अनेकांना शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांनी मोठं केले. ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे-जे देणे शक्य होते, ते सगळं दिलं. आता मातोश्रीवर अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिलं ते नाराज झाले आणि ज्यांना काहीच मिळाले नाही, ते सोबत आहेत. हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरू आहे, असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “मोठी बातमी! अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा”
न्याय देवतेने निकाल दिलाय. राज्यपालांनी 24 तासात लोकशाहीचे पालन केले. पण 12 विधानपरिषद सदस्यांच्या यादीबाबत त्यांनी आताही निर्णय घ्यावा. उद्या बहुमत चाचणी असल्याने मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. अनेक शिवसैनिकांना स्थानबद्ध केलं जात आहे. त्याबाबतच्या नोटिसा त्यांना आल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं
दरम्यान, मला खरंतर लाज वाटते, ज्या शिवसैनिकांनी या सगळ्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता. संपूर्ण रस्ते गुलालाने लाल झाले होते. त्यांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते तुम्ही लाल करणार आहात का? एवढी माणुसकीही विसरलात का? एवढं नातं तोडलं? त्यामुळे उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्यामध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल