Home महाराष्ट्र हे सुराज्य स्थापन करताना…; राज ठाकरेंनी मनसैनिकांसोबत घेतली शपथ

हे सुराज्य स्थापन करताना…; राज ठाकरेंनी मनसैनिकांसोबत घेतली शपथ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अशातचं काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सुपूत्र अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत पक्षातर्फे शपथ देण्यात आली.

हे ही वाचा : शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद

‘आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसविण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्र सुराज्य व्हाव म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहिल, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुलं शाळेत जाऊन शिकत असेल., असं राज ठाकरे म्हणाले.

लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, पारं, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, तसेच आमच्या शेतकरी बंधु-भगिनींना त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभीमानी, स्वावलंबी स्वराज्यांचे स्वप्न आम्हाला दिलं आहे, त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू, आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हे वचन देऊन आणि महाराज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो’., असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद

एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता

राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार