Home महाराष्ट्र राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार

राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. या प्रस्तावावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर करत एमआयएमसोबतच्या महाविकास आघाडीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळं आता दोन दिवस सुरू असलेल्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हे ही वाचा : येत्या काही दिवसात मी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

हा राजकीय निर्णय आहे, हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्याला तो निर्णय घ्यायचा अधिकार नाही. राष्ट्रीय समिती यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, हा आमच्या दृष्टीनं विषय संपला. राज्याला यासंबंधीचा निर्णय घेऊ शकता हे राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही राज्यात हा निर्णय घेता येणार नाही, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्षे राहून मनोरंजनच केलं; रावसाहेब दानवेंचा पलटवार

MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल

‘…मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो’; MIMच्या ऑफरवरुन शिवसेनेची फडणवीसांवर टीका