Home महाराष्ट्र कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला?- संभाजी भिडे

कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला?- संभाजी भिडे

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.

कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जागतील, जे मारायचे ते मारतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे., असंही संभाजी भिडे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

वकील आहात, त्यामुळे लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका- नितेश राणे

शपथा घेऊन सुटका होत नसते- अतुल भातखळकर

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल, पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ