आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. अशातच भाजपचे नेते सुधीर मुगंटीवार यांची जुनी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरुन राज्य सरकारमधील मत्र्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. एसटी महामंडळ आधीच तोट्यात आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते राज्यातील एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकेकाळी आग्रही होते. पण आज स्वतः सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी काहीही करताना दिसत नाही. आता कुठे गेला त्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा : भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य
एसटी कर्मचारी एकापाठोपाठ एक आत्महत्या करत आहेत, हे सरकारला दिसत नाही? कर्मचाऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल करण्यात व्यस्त आहेत. यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी उत्तर द्यावे. ठाकरे सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबाबत संपावर तोडगा काढावा. अन्यथा कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि जनता या सरकारला माफ करणार नाही. असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सरकारने कामगार आणि जनतेला ओलीस न ठेवता, वेळ न दवडता आणि आत्महत्यांची वाट न पाहता संप त्वरित सोडवावा. जनतेचे आणि महामंडळाचे होणारे नुकसान टाळावे, अशीच आमची मागणी आहे. त्यासाठी सरकारला काही सहकार्य लागत असेल तर आम्ही तयार आहोत, या एसटी कामगारांची दिवाळी तशीच अंधारात गेली. अशा परिस्थितीत सरकारला असलेल्या अधिकारांच्या जोरावर, या समस्या शासकीय पातळीवर सोडवण्याची गरज आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जुन्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून गैरसमज पसरवण्यात मंत्र्यांसह संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली दिसते. हे दुर्दैवी आहे. जुन्या व्हिडीओ क्लिप काढायच्या असतील तर शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागण्या, एसटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सुचविलेल्या उपायांची जुनी वक्तव्येही ऐकता येतील. ही सारी मंडळी आता सत्तेत आहेत, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी
“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ माजी आमदार असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत”
अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीये- प्रवीण दरेकर