आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला कर्नाटकमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, हे सत्य आहे. जे निवडून आले त्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकमध्ये 1985 पासून कुठलंच सरकार रिपीट होत नाही. सातत्याने ते बदलत असते. यावेळी तो ट्रेंड तोडू शकू असं आम्हाला वाटत होतं. पण, तो ट्रेंड तोडू शकलो नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : “सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना ते म्हणाले, 2018 साली भाजपच्या 106 जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला 36 टक्के मतं होती. आता आम्हाला 35.5 टक्के आहेत. अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं भाजपची कमी झाली आहेत. परंतु, जागा 40 कमी झाल्या आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
भाजपाचा दारूण पराभव, कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर
सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…