आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तसेच याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. अशाही चर्चा सध्या राज्यात सूरू आहेत. यावरून आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावात शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार- रामदास आठवले
“काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं