देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते, तेंव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला

0
4

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस होता. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताना त्यांनी पवारांना टोला लगावला.

हे ही वाचा : एसटीला फायद्यात आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला ‘हा’ महत्वपूर्ण उपाय; म्हणाले…

माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा टोला लगावत फडणवीसांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांचं राजकारण संपलं आहे, असं देवेंद्र फडणवीस बोलले होते. देवेंद्र फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो. त्यामुळे 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास व्यक्त मलिकांनी यावेळी व्यक्त केला. तसेच फडणवीस जेंव्हा शाळेत जात होते, तेंव्हा भाजपची खासदारांची संख्या दोन होती, तसेच तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात का?, असा टोलाही नवाब मलिकांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 ला दिल्लीत होणार”

“मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप”

…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here