मुंबई : जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय?, असा सवाल करत निलेश राणेंनी राज्य अजित पवारांवर टिका केली आहे.
मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय??? https://t.co/GC1QgJYE1x
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 7, 2020
दरम्यान, महाराष्ट्र सरकार उत्तम काम करतय. नाव ठेवायला जागाच ठेवली नाही. उद्या जाहीर करतील हा चहावाला त्याची किटली परदेशातून घेऊन आला होता पण आम्ही किटली सकट त्याला क्वारंटाईन मध्ये पाठवला, असंही राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आम्ही हे हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय- जितेंद्र आव्हाड
मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर येणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवार संतापले
“महाराष्ट्र पूरस्थितीत असताना फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची आठवण का झाली नाही?”
…तर स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाहीत; नाना पाटेकरांच जनतेला आवाहन