Home महाराष्ट्र नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला

मुंबई : गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उपस्थित केला होता. यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मूर्तीची उंची जेवढी मोठी, तेवढी माणसं अधिक लागतात. तसेच मोठ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे गेल्या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीला चार फुटाची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे 10 ते 15 भाविकांमध्ये विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं होतं. 20-22 फुटांच्या मूर्ती असतील तर कार्यकर्त्यांचा लवाजमा अधिक लागतो., असं मनिषा कायंदे म्हणाल्या. त्या टी.व्ही.9 मराठीशी बोलत होत्या.

दरम्यान, आता राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा टोला मनिषा कायंदे यांनी यावेळी लगावला. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी गणपतीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध? असा प्रश्न करणं हे दिवाळखोरीचं लक्षण आहे, अशी टीकाही मनिषा कायंदे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश राणेंचा इशारा

पवारांनी काँग्रेसचे चपखल वर्णन केलंं, आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की…; फडणवीसांचा टोमणा

‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्वागत करू’; नारायण राणेंची ‘त्या’ वक्तव्यावरून पलटीपंतप्रधान मोदींच्या काळात नोटाबंदी, जीएसटी मुळे देशातील लक्ष्मी घटली- राहुल गांधी