Home क्रीडा रोहित शर्मा कर्णधार असताना विराट कोहलीला संघात काय स्थान असेल; स्वत: रोहितनं...

रोहित शर्मा कर्णधार असताना विराट कोहलीला संघात काय स्थान असेल; स्वत: रोहितनं दिलं उत्तर, म्हणाला…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आता उद्यापासून न्यूझीलंड संघाविरूद्ध मालिका खेळणार आहे. यावेळी भारत न्यूझीलंडविरूद्ध टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच यावेळी टी-20 संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा दिसणार आहे, तर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड जबाबदारी सांभाळणार आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

उद्यापासून या सामन्यांना सुरुवात होत असून तत्पूर्वी राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी रोहितला, विराट कोहलीला आता संघात काय स्थान असेल असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर  रोहितनंही सर्वांचं मन जिंकणारं उत्तर दिलं.

कोहली आजपर्यंत संघासाठी जे करत होता तेच करणार आहे. तो जेंव्हाही संघासाठी खेळतो त्याची एक वेगळी छाप सोडत असतो. विराट संघात असेल तर संघ मजबूत होतो. कारण त्याच्याकडे खूप अनुभव असून तो एकर उत्कृष्ट फलंदाज आहे, असं दिलखुलास उत्तर रोहित शर्मानं यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे”

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या- नाना पटोले