उद्धव ठाकरे, यांच्यासोबत जे केलं, तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत…; अजित पवारांचं मोठं विधान

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीत बंड करत, अजित पवारांनी, शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या राजकारणात अजित पवारांचं बारामतीकडे दुर्लक्षच झाले आहे. स्वत: अजितदादांनी याबाबत कबुली दिली आहे.

प्रत्येक पक्ष बेरजेचा राजकारण करत असतो. त्यामुळे जिल्हा निहाय, तालुका निहाय संघटनेचे काम गतीने चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षनेते असताना दर आठवड्याला मी बारामतीला जात होतो. पण, आज मी उपमुख्यमंत्री आहे. माझ्यावर अधिक भार आहे. बारामतीमुळेच मी इथे आहे. गेले एक महिने २० दिवस झाले मी बारामतीला गेलो नाही. लवकरच मी तिथे जाणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितले., असं अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री होतो. त्यांची आणि माझी फार ओळख नव्हती. पण, त्यांना अडीच वर्ष साथ देण्याचे काम केले. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही मी तेच करत आहे. त्यांना साथ देत आहे. मुख्यमंत्री पदाबाबत माझ्या मनात तसा विचार कधी शिवला नाही. हे मी आधीही स्पष्ट केलं आहे, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”

“शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही; अजित पवार गटातील ‘या’ नेत्याची टीका”

नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…; ठाकरे गटाकडून मोठी ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here