मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?- शरद पवार

0
452

कोल्हापूर : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळं काही संधी आहे का?, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकाराने विचारला. त्यावर उद्या मला मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही, असं शरद पवारांनी हसत उत्तर दिलं.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. त्यासाठी  शरद पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी- चित्रा वाघ

धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली

नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here