आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीनं प्रतिक्रिया देत मोदींवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? , असा सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केला.
या काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत., असा आरोपही राष्ट्रवादीनं केला.
या काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत.#ModiDisasterForIndia
— NCP (@NCPspeaks) December 31, 2021
भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे., असे अनेक सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केले.
शाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे.
— NCP (@NCPspeaks) December 31, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले
मंत्री, आमदार कोरोनाबाधित; राज्यात कठोर निर्बंध लागणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी”