आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाचं समर्थन केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटाकूडन आपणच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा दावा केला जातोय. पण अजित पवार हेच मुख्य नेते आहेत, असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. अशातच पटेल यांनी शपथविधीच्या दोन दिवस आधी घडलेल्या घडामोडींचा प्रसंग सांगितला.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची कोयता व कुऱ्हाडीने वार करून हत्या”
30 जून 2023 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला अनेक लोकं उपस्थित होते. ती बैठक अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार तिथे उपस्थित होते. दोन्ही सदनाचे आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्या 30 तारखेच्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून निवडलं. त्यामुळे अजित पवार यांनी दोन-तीन प्रक्रिया नंतर केली”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
भारत विरूद्ध पाकिस्तान सामना, हिंदुस्तानात व्हावा हे न पटणारं; मनसेची संतप्त प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत