आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. या बंडामुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. या बंडावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पहिल्यांदाच मुलाखत दिली.
ही मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असं उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलं. तसंच बंडखोरी होण्याआधी नेमकं काय घडलं?, याचाही खुलासा उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत केला.
हे ही वाचा : तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
खूप वेदनादायी आहे तो प्रकार. मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं . काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती., असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
शिंदे गटात यायला नकार दिल्यानं शिवसैनिकाला जोरदार मारहाण; सांगलीतील शिवसेना नगरसेविकाचा आरोप
“एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का; ‘हा’ नेता आता शिंदे गटात सामील”