Home महाराष्ट्र तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं...

तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. या बंडामुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. या बंडावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पहिल्यांदाच मुलाखत दिली.

ही मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. यावेळी त्यांनी ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असं म्हणत संजय राऊत यांनी पक्षातील बंडखोरांबाबत विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर बोलू का? असा प्रश्न विचारला. तसेच मला माझ्या त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे, असं ठाकरे म्हणाले. तसेच सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप यावेळी ठाकरेंनी केला.

पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला, असाही आरोप ठाकरेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटात यायला नकार दिल्यानं शिवसैनिकाला जोरदार मारहाण; सांगलीतील शिवसेना नगरसेविकाचा आरोप

“एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का; ‘हा’ नेता आता शिंदे गटात सामील”

“कोल्हापूरातील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?; खासदार धैर्यशील मानेंची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”