मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. बंगालमध्ये विधान परिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असं विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ममता बॅनर्जी या नेत्या आहेत. त्या नंदीग्राममधून हरल्या असल्या तरी बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या शपथ घेऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झालं असेल”
उद्या भाजपाची राज्यभरात निदर्शनं; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा
…म्हणून कंगणा राणावतला झाले अश्रू अनावर; पहा व्हिडीओ
कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत