भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी

0
245

विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामन्यात 107 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.  रोहित शर्मा आणि लोकेश राहूल यांच्या दमदार शतकी खेळी मुळे भारताने वेस्ट इंडिज समोर 387 धावांचा डोंगर उभा केला.

रोहित शर्माने 138 चेंडूत 159 धावां  आणि के. एल राहूलने 102 चेंडूत 104 धावांची खेळी केली. तर  श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 53 धावा केल्या. वेस्ट इंडिज कडून शाई होपने 85 चेंडूत 78 धावा  तर निकोलस पूरणने 47 चेंडूमध्ये 75 धावां करत वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारताकडून कुलदीप यादवने हॅट्रिक केली. कुलदिपने 52 धावा देत 3 बळी घेतल्या.  मोहम्मद शमी नेत 39 धावा देत 3 बळी घेतल्या तर रविंद्र जडेजाने 74 धावा देत 2 बळी घेतल्या.

दरम्यान, भारताने दिलेल्या 387 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 280 रनवर ऑलआऊट झाला.

महत्वाच्या घडामोडी-

-भाजपच्या ‘या’ खासदाराने दिला भाजपलाच घरचा आहेर; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणं ही चूक

-“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”

-शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका; त्यांना योग्य तो न्याय द्या- चंद्रकांत पाटील

-मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here