सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0
478

पुणे : स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 7 जुलै रोजी होणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील निसर्ग या कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार असून प्रिया बेर्डे यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार-तंत्रज्ञ देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा समावेश आहे.

दरम्यान, पुणे शहर फार महत्त्वाचं आहे. या शहरामधूनच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या कामाची सुरूवात झाली होती. तसंच बेर्डे कुटुंबासाठी हे शहर फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्यामुळे माझ्या नव्या कारकीर्दीला देखील पुण्यातून सुरूवात करण्याची इच्छा आहे. पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला- नारायण राणे

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडे समर्थकांसाठी गुडन्यूज!

बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here