मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
आजपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
आज यासंदर्भात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध लावायचे या अनुषंगाने चर्चा झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात बागा, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. याशिवाय याआधीच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवरही सरकारनं बंदी घातलेली आहे. मंदिरात फक्त पुजाऱ्यांना पुजा करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
“IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”
“टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे”