Home क्रीडा “IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”

“IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. आयपीएल सूरू होण्यास  अवघे काही दिवस शिल्लक असतानाच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अक्षर या आयपीएल हंगामातील 7 ते 8 सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात खेळताना जखमी झाला होता. त्यानंतर तो या वर्षीची पुर्ण आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी सोपवण्यात आली.

दरम्यान, यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे. यावेळी, आयपीएलचे सामने मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामन्यांचे आयोजन होणार आहे. तसेच मुंबईत मात्र प्रेक्षकांविना सामन्याच आयोजन होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे”

माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत- प्रवीण दरेकर

“मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे फडणवीसांनी सांगायला हवं”

उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला