आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच बंडखोर आमदारांचा गट भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच शिंदे गटात सामील असलेल्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
संबंधित व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत, पण हा निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर का आली, ते तुम्ही समजून घ्यावं. तसेच हा व्हिडीओ भायखळा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यामिनी जाधव यांचा आहे.
हे ही वाचा : “शरद पवार गोड बोलून काटा काढतात”;शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य
दरम्यान, या व्हिडिओमध्ये यामिनी जाधव म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही समजू शकतो. कारण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. यापुढेही शिवसैनिक राहणार. पण आम्ही हा निर्णय का घेतला हे समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं आहे. कॅन्सर झाल्याचं जेव्हा मला आणि कुटुंबाला समजलं, तेव्हा सर्व कुटुंब तुटलं. कॅन्सर झाल्याची माहिती आपल्या पक्षाला द्यायला हवी, म्हणून यशवंतराव जाधवांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना याची माहिती दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अशी अपेक्षा होती की, शिवसेनेचे काही नेते माझ्या घरी येतील, विचारपूस करतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत. हीच गोष्ट मोठी हेलावणारी होती. मी स्वत: कॅन्सरच्या नावानं कोलमडून गेली होती. त्याकाळात भायखळा विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी खूप साथ दिली. त्यांचे आजही आभार मानू इच्छिते., असं यामिनी जाधव म्हणाल्या.
पण शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून माझी विचारपूस केली जाईल. एक आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या कुटुंबाला मिळेल. अशी माझी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या कोणत्याही नेत्यांनी माझी विचारपूस केली नाही. मी स्वत: 2012 पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाल्याचं पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींना रुग्णालयात जाऊन भेटल्याचंही मी पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींप्रमाणे माझी अगदी मरणाशय्य अवस्था होणं गरजेचं होतं का? मग माझ्या पक्षातील नेते मला बघायला आले असते का? ही गोष्ट मनात खलत होती., असंही यामिनी जाधव यांनी ट्विटमध्ये म्हणाल्या.
शिवसेना आमदार सौ यामिनी (ताई) जाधव यांनी सांगितला भावपूर्ण प्रसंग…. आम्ही सर्व शिवसेनेतच पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजुन घ्यावं….
संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य… pic.twitter.com/cAkFEocOYk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 24, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मी आजही शिवसैनिक, कायम उद्धवजींसोबत; शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं ट्विट
…असल्या घमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर