नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…; ठाकरे गटाकडून मोठी ऑफर

0
261

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवण्यात आला. यानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, नितीन गडकरींबाबत मोठं विधान केलं आहे.

आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील, असा दावा विनायक राऊत यांनी यावेळी केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : “ठाकरे गटाला दिलासा, भाजपमधील ‘हा’ मोठा नेता पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार”

महाराष्ट्राचं एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी त्यांना दाखवावं., असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. गडकरींनी ‘इंडिया’ आघाडीत यावं. आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील, असंही विनायक राऊतांनी यावेळी नमूद केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने खळबळ”

“बाॅम्ब घेऊन तयार रहा, आलेल्या लोक प्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा; ‘या’ माजी आमदाराचा अजब सल्ला”

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उचलणार ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here