मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंदिरात आल्यावर आपण फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मुर्तीकडेच पाहतो. या मंदिरात प्रत्येक खांब आणि दगड काही ना काही बोलत असतो’, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर, आम्हाला पुन्हा आषाढी वारीत तुडूंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, यावर्षी केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
“ओबीसींना आरक्षण मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही”
“माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास”