Home महाराष्ट्र “बा विठ्ठला, आमचे मुख्यमंत्री जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच...

“बा विठ्ठला, आमचे मुख्यमंत्री जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”; मनसेचा टोला

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली. विषेश म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले. त्यावरुन मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’. जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली आहे.

मंत्रालयात जायला वेळ नाही. लॉक डाउन मुळे लोक आत्महत्या करतायत तिथे बघायला वेळ नाही. बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. आणि करोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला सर्वात पुढे.आमचा मुख्यमंत्री जगात भारी, असंही ,संदिप देशपांडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे; मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं

“ओबीसींना आरक्षण मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही”

“माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास”

‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स; अमोल मिटकरींचा टोला, म्हणाले..