आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
हे ही वाचा : राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
‘यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते’ असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावरून आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे जे दोन खासदार निलंबित झालेले आहेत, त्यातील अनिल देसाई हे अद्याप दिल्लीत गेलेले नाहीत. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल एक चकार शब्द काढला नाही उलट सिपीएमचे खासदार जे कोणी बोलले आहेत, त्यांच्याविरोधात प्रियंका चतुर्वेदींनी आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांनीच त्याचा धिक्कार केला. तरीही देवेंद्र फडणवीस यांचं रडगाणे सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही, असा पलटवार विनायक राऊतांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल
फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांना घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही; जयंत पाटलांचा टोला
“अखेर महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरियंटची एन्ट्री; ‘या’ शहरात आढळला पहिला रूग्ण”