मुंबई : आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भाजप कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपला कुणाचीही फिकीर नाही. असं नारायण राणे म्हणाले.
खरंतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे 54 पैकी 35 आमदार नाराज आहेत. हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकत नाही कारण या सरकारला सिरीयस बेस नाही. या सरकारला राज्याचं प्रशासन आणि विकास कसा करायचा ते माहित नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली खरी,पण कर्जमाफीच्या जीआरमध्ये अंमलबजावणीच्या तारेखचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
फडणवीसांना नागपूर जिंकता आलं नाही आणि ते बारामतीच्या जिंकण्याच्या गोष्टी करतात
चेहरा झाकून हल्ला करता आणि स्वत:ला मर्द समजता- सुनील शेट्टी
पहिल्याच बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना मोलाचा सल्ला, म्हणतात…
दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी