सातारा : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना इतर स्लोगन न वापरण्याची समज दिली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी एक ट्विट केलं आहे.
शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो. यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करून राज्यसभेची संधी लोकहितासाठी वापरणार. जय भवानी, जय शिवराय!, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे उदयनराजे भोसले यांनी बोलकं ट्विट केलं आहे.
शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो. यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करून राज्यसभेची संधी लोकहितासाठी वापरणार.
जय भवानी, जय शिवराय! pic.twitter.com/63VcWigzp5— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
“…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक
राणे पिता पुत्रांवर शिवसेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा