मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वारंवार कळवा-मुंब्रा येथील रहिवाशांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या अशी विनंती करत आहेत.
अद्यापही अनेक ठिकाणी लोक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना घराबाहेर पडलात तर 14 दिवस जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली असल्याची ताकीद दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी स्पीकरच्या माध्यमातून यावेळी जानकी नगरमधील लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हे आम्हाला हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता.
महत्वाच्या घडामोडी-
मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर येणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवार संतापले
“महाराष्ट्र पूरस्थितीत असताना फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची आठवण का झाली नाही?”
…तर स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाहीत; नाना पाटेकरांच जनतेला आवाहन
‘या’ ठिकाणी होणार करोनाचं निदान करणाऱ्या तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी