देवेंद्र फडणवीसांची ‘कुडल्यां’ची भाषा धमकी नव्हती काय?; संजय राऊतांचा सवाल

0
186

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याला गंभीर आरोप करत धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. विरोधी पक्षानंही त्यांच्या पद्धतीनं वर्षपूर्ती साजरी केली. त्याचा मी आदर करतो, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का?; ईडी प्रकरणावरून बच्चू कडूंचा भाजपवर हल्ला

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका- धनंजय मुंडे

महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला- सचिन सावंत

महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here