Home महाराष्ट्र “कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

“कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

अमरावती : नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

कंगना रणौतचं ऑफिस बुलडोझरने पाडणं, तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही या घोषणा देणं हा मर्दपणा होता का? कुणाच्या बायका – मुलांना ईडीची नोटीस आली  तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगनाविरोधात जी कारवाई केली तो मर्दपणा होता का? कंगनाविरोधात जो आकांडतांडव केला तो मर्दपणा होता का? असे सवाल आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीच्या एका नोटिशीमुळे संजय राऊत चांगलेच हादरले आहेत. त्यांनी दमबाजी करु नये. भाजपा दमबाजीला भित नाही असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

“…पण आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार”

“नारायण राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरी