“वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन

0
187

मुंबई :  पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केले आहे. राज्याच्या विविध भागात काँग्रेसच्या दिग्गज नेते-मंत्र्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ‘स्पीक अप इंडिया’ हे आंदोलन भारतभर सुरु केले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अमरावती अशा ठिकाणी काँग्रेसचे आंदोलन झाले. तसेच सोशल मीडियावरही काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध केला.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली.

महत्वाच्या घडामोडी-

…तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; संजय राऊतांचा गडकरींना टोला

कोणाच्या धमकीला मी घाबरत नाही; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

“रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड”

…अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here