आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढउतार पहायला मिळालं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकप आधी कर्णधारपद सोडणार, असं जाहीर केलं. त्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर अनेकांनी विराट कोहलीवर टीका केली. यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राहुल द्रविडने विराट कोहलीचं खूप कौतुक केले आहे आणि कोहली एक महान कर्णधार आहे, असं द्रविडनं कोहलीला संबोधलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी द्रविडनं पत्रकारांशी संवाद साधला.
हे ही वाचा : “…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”
अनेक वादानंतरही विराट कोहली आपल्या कर्णधाराची भूमिका अधिक चोखपणे पार पाडत आहे. त्याने संघाचे मनोधैर्य खचू दिलेले नाही आणि ड्रेसिंग रूममध्येही चांगले वातावरण आहे., असं द्रविड यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, मला माहित आहे की, या कसोटी सामन्यापूर्वीही अनेक गोष्टी घडल्या होत्या. पण संघाचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याबद्दल बोलायचे झाले तर अजिबात अडचण नव्हती कारण हे काम स्वतः कर्णधार विराट कोहली करत होता., असं म्हणत द्रविडनं कोहलीवर स्तुतीसुमने केली.
महत्वाच्या घडामोडी –
प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से; चित्रा वाघ यांचा टोला
मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा