सिडनी : सर्व क्रिकेटचाहत्यांचं लक्ष आता भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकांकडे लागलं आहे. शुक्रवार म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. यावेळी विराट कोहली हा महान खेळाडू आहे, अशी प्रतिक्रिया फिंचने दिली. पहिल्या सामन्या आधीच्या पत्रकार परिषदेत फिंचने ही प्रतिक्रिया दिली.
विराट महान खेळाडू आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोतकृष्ट खेळाडू आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विराट परिपूर्ण खेळाडू आहे. एका क्रिकेटपटूमध्ये हवे असलेले सर्व आवश्यक गुण विराटमध्ये आहेत. त्याच्या रेकॉर्डच्या आसपासही कोणी नाहीये., असं फिंच म्हणाला.
दरम्यान, विराटला बाद करण्याच्या हेतुने आम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तसेच नियोजनानुसारच खेळ करावा लागेल. विराटला लवकर बाद केलं नाही, तर सामना आमच्या हातून निसटेल, अशी भितीही फिंचने यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची- अतुल भातखळकर
“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”
मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून रास्ता रोको आंदोलन; सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
“चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही”