Home महाराष्ट्र “ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”

“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”

ठाणे : भाजपच्या मोर्चाला परवानगी मिळते, पण मनसेच्या मोर्चाला मिळत नाही, कारण ठाकरे सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरतं, असं म्हणत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

वीज बिलाविरोधात भाजप मोर्चा काढतं, तेव्हा त्याला परवानगी मिळते. पण मनसे मोर्चा काढतो, त्याला परवानगी देत नाहीत, हा कुठला न्याय? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.

दरम्यान, ठाकरे सरकार मनसेला घाबरते. हे सरकार उखडून फेकायचं आहे., असं म्हणत अविनाश जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काहीही झाले तरी आंदोलन होणार. किती वेळा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार?, असा सवालही अविनाश जाधव यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून रास्ता रोको आंदोलन; सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

“चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही”

सुडाचे उत्तर सुडाने देऊ म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान- प्रविण दरेकर

…जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित