आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आरक्षणाच आंदोलनाचा आवाज अशी ओळख असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. यानंतर आता त्यांच्या पार्थिवावर बीड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
हे ही वाचा : “विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”
विनायक मेटे यांच्या निधनानंतर पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव हे मुंबईतील निवासस्थानी ठेवले जाणार आहे. येथे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी दर्शन घेतल्यानंतर रस्ते मार्गानेच पार्थिव हे बीडकडे रवाना होणार आहे. मार्गस्थ होत असताना वाशी नाका, कळंबोली, तळेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
दरम्यान, चाकण, शिक्रापूर, नगर, टाकळी मार्गे पार्थिव हे बीड येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…