Home महाराष्ट्र माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची...

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज अशी ओळख असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. याचा मोठा धक्का राजकीय वर्तुळासह त्यांच्या कुटूंबियांनाही बसला. मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातोश्री यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या मातोश्रींनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा : विनायक मेटेंचे पार्थिव बीडकडे होणार रवाना; सोमवारी दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

काल दुपारी 4 वाजता मेटे हे आपल्या आईला भेटून आले होते, त्यावेळी माझे पाय दुखत होते, तेंव्हा त्यांनी पाय पाहिला आणि म्हणाला, 22 तारखेला दवाखान्यात घेऊन जातो असंही त्यांनी सांगितले होतं. मात्र विनायक मेटेंचा अपघात झाला त्यारात्री मी झोपले नाही, मला झोप लागत नव्हती, काहीच सुधारत नव्हतं, टीव्ही पाहू वाटत नव्हती, सकाळी बाहेरचं झाडून काढलं होतं त्यावेळी आपल्याला उदास वाटत होतं, त्यानंतर आम्ही सकाळी मुंबईला आलो, मात्र त्यांच्या निधनाची बातमी आपल्याला कोणी सांगितलं नव्हतं, त्यामुळे माझी मागणी आहे की, माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, त्याची चौकशी करायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”

वाहनांना हात केला, 100 नंबरला फोन लावला, पण तासभर मदतच मिळाली नाही; विनायक मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप

आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण