आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापुरमधील दख्खनचा राजा जोतिबा हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. जोतीबा मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले करावेत, ई -पास पद्धत बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवलं.
जोतिबा देवाचे खेटे सुरू असल्याने भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गावातील गुरव समाजाने ई पास बंद करून चारही दरवाजे सुरू करावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. तसेच याबाबत निर्णय न झाल्याने आज सकाळपासून गावातील दुकाने बंद राहिली.
हे ही वाचा : “राजकीय वातावरण तापलं, शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण”
दरम्यान, व्यापारी, विक्रेते, गुरव समाज, मानकरी, ग्रामस्थ, महिला यांनी गाव बंद ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले
“उत्तर प्रदेशात शिवसेना भाजपला आव्हान ठरतंय?; शिवसेना नेत्यामुळे भाजप उमेद्वाराचा पराभव”
ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील