Home नाशिक आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले

आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धुळे : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलीय. तसेच यंदा काहीही झालं तरी मुंबई महापालिका यंदा आमचीच अशी हाक भाजप नेत्यांनी दिली आहे. अशातच आता रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजप नेत्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रत भाजपा – रिपाई युतीचे सरकार येणार असून विरोधकांची दयनीय अवस्था होणार, असं रामदास आठवले म्हणाले. तसेच आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपाचा महापौर व रिपाईचा उपमहापौर होणार असल्याचंही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं. ते धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “उत्तर प्रदेशात शिवसेना भाजपला आव्हान ठरतंय?; शिवसेना नेत्यामुळे भाजप उमेद्वाराचा पराभव”

काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दशकापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र आगामी निवडणुकीत आम्ही मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेऊ, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तसेच केंद्राचा व केंद्रीय तपास यंत्रणाचा काही संबंध नसून ते स्वातंत्र्य असल्याचं आठवलेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील

ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील

संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरलं पाहिजे, कारण…; चंद्रकांत पाटलांचा सल्ला