Home पुणे सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शिर्डी : काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, अशी टीका संजय राऊतांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून केली होती. ‘सामना’च्या या टीकेवर विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सामना’ च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे.

दरम्यान, एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…

सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा सवाल

तुमच्या मनातली भीती अशीच कायम राहिली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार