आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आहे. आणखी तीन टप्प्याचं राज्यातील मतदान बाकी आहे. मात्र त्याधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.
सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेंव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
ही बातमी पण वाचा : ‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा
दरम्यान, ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागातही आम्हाला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
गोपाळकृष्ण शाळेत ‘एक पुस्तक आनंदाचे ‘ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन
“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”
“काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये”