आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये आंंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट तयार झाली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र राज्यगृह मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
उत्तर प्रदेशात राज्यात भाजप नेहमी रामराज्याविषयी बोलत आहे. परंतु ते राम राज्य नाही आहे ते किलिंग राज्य आहे. लोक मारले जातात आणि सरकार 144 कलम लागू करत आहे., असा घणाघात ममता बॅनर्जींनी केला.
दरम्यान, एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खीरीमध्ये इतक्या शेतकऱ्यांची हत्या केली आहे. आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी काळात शिवसेना बॅक टू पॅव्हेलियन होऊ शकते; रामदास आठवलेंच्या विधानानं राजकीय चर्चांना उधाण
“आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ‘या’ पक्षासोबत युती?”