Home महाराष्ट्र इंदिराजींचा देशासाठी त्याग, प्रियांका त्यांची नात, पीडितेची भेट घेणं गुन्हा आहे का?;...

इंदिराजींचा देशासाठी त्याग, प्रियांका त्यांची नात, पीडितेची भेट घेणं गुन्हा आहे का?; संजय राऊत कडाडले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये आंंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट तयार झाली आहे. रात्री काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लखीमपूरला शेतकऱ्यांच्या कुटूंबियांचे सांत्वण करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी रोखलं. तसेच मध्यरात्री उशिरा त्यांना अटक केली. यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेत निरापधार लोकांचे बळी गेलेत. पंतप्रधान मोदी संवेदनशील आहेत. मग या घटनेवेळी त्यांची संवेदना कुठे गेली होती., असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

कळस म्हणजे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी अडवून धरलं. त्यांना स्थानबद्ध केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?, असेही अनेक सवाल करत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

महत्वाच्या घडामोडी –

देगलूर विधानसभा निवडणूक! भाजपने शिवसेना नेता फोडून उमेेदवारी दिली, आता काँग्रेसकडूनही तोडीस तोड उमेदवार

निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत

मोठी बातमी! MPSC कडून 2021 ची जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या माहिती

पुण्यात भाजप-मनसेची युती झाल्यास ‘या’ दोन नेत्यांचे मनोमिलन होणार?