Home नांदेड निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत

निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकीत साबणे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला गेला. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण हे भाग्यवान आहेत. सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण, त्यांनी लाचार होऊन मंत्रिमंडळात सामील झाले. तसेच सरकारमधील लोक नोटा मोजून थकले आहेत. त्यामुळं या निवडणुकीत पैशांचा मोठा वापर होणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा. मतदान करा म्हणाले की खोट्या शपथा घ्या आणि मतदान साबणेंना करा, असं आवाहन खोतांनी कार्यकर्त्यांना केलं.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! MPSC कडून 2021 ची जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या माहिती

पुण्यात भाजप-मनसेची युती झाल्यास ‘या’ दोन नेत्यांचे मनोमिलन होणार?

शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत या सरकारला जगू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

“नाशिकमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”