आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे ही वाचा : नाना पटोलेच काही दिवसांनी भाजपमध्ये येतील, मात्र आम्ही…; नितीन गडकरींना आलेल्या ऑफरवर भाजपचं प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक होणार आहे. ही बैठक आज सकाळी 10 वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना या बैठकीबाबत उत्सुकता वाढली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया
शिंदे सरकारला मोठा धक्का ; ‘या’ कारणांमुळे झाला तब्बल 12 हजार कोटींचा दंड
मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले…