आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याचं कळताच अनेक नेतेमंडळींना रुग्णालयाकडे धाव घेतली. अशातच भाऊ दवाखान्यात दाखल झाल्याची माहिती कळताच भावाच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा आणि प्रीतम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
हे ही वाचा : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
धनंजय यांना हृदयविकाराचा झटका आला ही चुकीची बातमी आहे. त्यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आम्ही त्यांना भेटलो आणि बोललो, ते रिकव्हर होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, मुंडे बंधू भगिनींमधील राजकिय वाद आपल्याला नेमहमीच पाहायला मिळते. मात्र आज यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळाले.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी : ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…