आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. यावर शिवसेनेच्या उपनेत्या, विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या आज खेडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
शिवसेनेतील काही लोक इकडेतिकडे गेले तरी मूळ शिवसैनिक आपल्या पक्षाशी बांधील आहेत. शिवसेना हा मोठ्या नदीच्या प्रवाहासारखा आहे, त्यात छोटीमोठी वळणे, चढउतार आले तरी प्रवाह थांबत नसतो. येथे गावागावांत शिवसेनेच्या शाखा आहेत. त्या शाखांमध्ये दिवसरात्र काम करणारा शिवसैनिक इकडेतिकडे गेलेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांमुळेच शिरूरमध्ये परिवर्तन झाले होते. त्यामुळे याठिकाणी पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकेल, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी
दरम्यान, काहीही मिळवायच नसणारा त्यागी निष्ठावान शिवसैनिक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही. त्यामुळे या मतदारसंघात काही पोकळी निर्माण झाली वगैरे, असं आम्हाला वाटतही नाही. उलट मुक्तता अनुभवत असल्याने कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत, असंही निलम गोऱ्हेंनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंकजाताईंचं राष्ट्रवादीत स्वागत…; ‘या’ मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंना थेट ऑफर
भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
उद्धव ठाकरेंच्या मदतीला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धावला; ‘या’ नेत्याची शिवसेनेत घरवापसी